पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ…!एकाच पोलीस ठाण्यातील ३ पोलिसा कर्मचाऱ्यांना ACB ने पकडले रंगेहाथ..वाचा सविस्तर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-खाकी वर्दीला काळीमा फासणारी आणि पोलीस प्रशासनाला हादरवून टाकणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.गुन्ह्याची नोंद करण्यासाठी चक्क लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भरदिवसा रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून “रक्षकच बनले भक्षक” अशी चर्चा आता रंगू लागली आहे.’एसीबी’च्या जाळ्यात अडकलेल्या दादा म्हस्के,नितीन गाडगे,राजेश जाधव, असे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे.मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार,काही दिवसांपूर्वी एका अपघाताचा गुन्हा घडला होता.या अपघाताच्या गुन्ह्याची रीतसर नोंद पोलीस दप्तरी करणे गरजेचे होते.मात्र, कायद्यानुसार काम करण्याऐवजी दादा म्हस्के, नितीन गाडगे आणि राजेश जाधव या तिघांनी तक्रारदाराला अडवण्याचा प्रयत्न केला.गुन्हा नोंदवण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे तब्बल १०,००० रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली.तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नव्हती.त्यामुळे त्यांनी या भ्रष्ट प्रवृत्तीला धडा शिकवण्याचे ठरवले.तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) जाऊन या तिघांविरोधात रीतसर तक्रार नोंदवली.तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने हालचाली करत श्रीगोंदा पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला. दरम्यान,लाचेच्या रकमेसाठी पोलिसांकडून तडजोड करण्यात आली. १० हजार रुपयांवरून ही रक्कम अखेर ७,००० रुपयांवर निश्चित झाली.आज दुपारी ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी पोहोचला.
लाचखोर पोलीस कर्मचारी ७,००० रुपयांची लाच स्वीकारत असतानाच, दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने झडप घातली आणि तिघांनाही रंगेहाथ बेड्या ठोकल्या.“कायद्याचे रक्षकच जेव्हा लाच मागू लागतात, तेव्हा सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? ‘एसीबी’च्या या धडक कारवाईमुळे आता इतर लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतः पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडले गेल्याने इतर कर्मचाऱ्यांचीही पळापळ झाली.या तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसीबी’च्या या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
