कर्तव्यनिष्ठ सेवेतील माणूस – सुपा MIDC च्या महावितरण कर्मचाऱ्याचा मनसेकडून सन्मान
पारनेर (प्रतिनिधी):-सुपा MIDC औद्योगिक वसाहत दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे.मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि कंपन्यांची गुंतवणूक येथे होत आहे.या औद्योगिक वृद्धीमध्ये सर्वात महत्वाचा दुवा आहे तो म्हणजे अखंडित वीजपुरवठा उद्योजक करोडोंची गुंतवणूक करून उद्योग उभा करतात,परंतु उन,वारा, पाऊस, रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी फॉल्टमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तात्काळ सुरू करणे हे महावितरण कर्मचाऱ्यांचे महत्वाचे काम असते.
सुपा फेज १/२ औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरणमध्ये कार्यरत असले *श्री.बाळासाहेब( हरी) थोरात* यांनी आपल्या सेवेद्वारे याचे उत्तम उदाहरण घालून दिले. रात्री-अपरात्री कंपनीत लाईटची अडचण आल्यास फक्त प्लॉट नंबर सांगितला तरी थोरात यांनी तत्परतेने जाऊन समस्या सोडवून निष्ठेने कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या या सेवेमुळे उद्योग व्यवस्थापनात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला होता.आता बदलीनिमित्त थोरात यांची या ठिकाणाहून बदली झाली. त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवेची दखल घेत *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने* त्यांचा सन्मान करण्यात आला.
मनसे पारनेर तालुका अध्यक्ष श्री. अविनाश पवार* आणि *तालुका सचिव श्री. नारायण नरवडे* यांच्या हस्ते श्री. थोरात यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी महावितरणचे अभियंता श्री. पिसाळ साहेब वायरमन श्री.विटेकर, श्री. जरे, श्री. वेताळ* तसेच महावितरणचे इतर सहकारी कर्मचारी उपस्थित होते.औद्योगिक विकासाच्या पाठीमागे अशा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे, हेच या सन्मानातून दिसून आले.
