Crime..चायनागेट मध्ये कोयत्यांची दहशत’ मोडीत..! MIDC पोलिसांची धडक कारवाई तिघे ताब्यात..पोलिसांच्या झटपट कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-चायनागेट वडगाव गुप्ता शिवारात हातात लोखंडी कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.या कारवाईत लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा निर्माण झाला आहे.आयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास चायनागेट वडगाव गुप्ता शिवारात पोलिसांनी सापळा रचला.या वेळी तीन संशयित इसम हातात लोखंडी कोयते घेऊन स्कूटरवर फिरत असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्यांना पकडले.चौकशी केली असता त्यांची नावे अनुज पोपट बोरुडे (वय ३०,रा.जाधव मळा,वडगाव गुप्ता,ता.जि.अहिल्यानगर), पीयुष प्रविण गायकवाड (वय १९, रा.गजानन कॉलनी, एमआयडीसी,अहिल्यानगर), यश अरविंद गायकवाड रा.डॉन बॉस्को कॉलनी सावेडी अहिल्यानगर) अशी असल्याचे समोर आले.
त्यांच्या ताब्यातून मोपेड अॅक्सेस मोटारसायकल व सुमारे १००० रुपये किमतीचे दोन लोखंडी कोयते असे जप्त करण्यात आला.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेसी, पोलीस आमदार राकेश खेडकर, संदीप पवार,राजू सुद्रिक, सचिन अडबल,पितळे,किशोर जाधव, नवनाथ दहिफळे,ज्ञानेश्वर आघाव, अक्षय रोहकले यांनी केले आहे.
