एलसीबीची धडक कारवाई फॅब्रिकेशन घरफोडीचा छडा लावत ३ आरोपी जेरबंद तर २८ अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर छापे..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेने सलग दोन मोठ्या धडक कारवाया करत एमआयडीसी परिसरातील फॅब्रिकेशन दुकानाची घरफोडी उघडकीस आणली असून ३ आरोपींना १ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे,तर दुसरीकडे जिल्ह्यातील अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर २८ ठिकाणी छापे टाकून २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.२६ नोव्हेंबर २०२६ रोजी फिर्यादी भाऊसाहेब दिगंबर लामटुळे रा.पितळे कॉलनी,नागपूर,अहिल्यानगर यांच्या साईकृपा फॅब्रिकेटर्स दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २४ हजार रुपयांचे फॅब्रिकेशन साहित्य चोरून नेले होते आणि याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०४९/२०२६ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल होता.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सपोनि. हरीष भोये व पोलीस अंमलदार विजय ठोंबरे,रिचर्ड गायकवाड,राहुल डोके,सुनिल मालणकर,फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे पथक रवाना केले असता, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी जुने आरटीओ ऑफिसजवळ सापळा रचून आरोपी सोमनाथ राजू केदारी वय २३ रा. गांधीनगर,बोल्हेगाव,ता. अहिल्यानगर,अफताब असिफ शेख वय २६ व समीर असीफ शेख वय २५ रा.नंदनवननगर, बोल्हेगाव,ता.अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्यांच्याकडून ९० हजार रुपयांची सुझुकी मोपेड क्र. एमएच-१६-सीक्यु-१२४५,३ हजार रुपयांचे ग्रँडर मशीन, १२ हजार रुपयांची १२ किलो तांब्याची तार व इतर साहित्य असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.याचबरोबर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. कृष्णकुमार सेदवाड,विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार गणेश लबडे, रणजीत जाधव,सोमनाथ झांबरे,अरूण गांगुर्डे,गणेश धोत्रे,अतुल लोटके,रोहित मिसाळ,भाऊसाहेब काळे, दिपक जाधव,अशोक लिपणे, योगेश कर्डीले,किशोर शिरसाठ,बाळासाहेब नागरगोजे,बाळासाहेब खेडकर,अमृत आढाव, संभाजी कोतकर,बिरप्पा करमल,अमोल कोतकर, शामसुंदर जाधव,प्रताप देवकाते,मनोज साखरे व भगवान धुळे यांच्या पथकाने २८ नोव्हेंबर २०२६ रोजी अवैध दारूचे २३ आणि अवैध जुगाराचे ५ असे एकूण २८ छापे टाकून २८ गुन्हे दाखल केले व २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अवैध दारूच्या २३ कारवायांमध्ये अकोले २ गुन्हे ३,७६० रुपये, कर्जत ६ गुन्हे ६८,२५० रुपये,शनिशिंगणापूर ५ गुन्हे १६,४५५ रुपये,नेवासा ३ गुन्हे ९,३७५ रुपये आणि श्रीगोंदा ७ गुन्हे १,३९,१९० रुपये असा एकूण २,३७,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला,तर अवैध जुगाराच्या ५ कारवायांमध्ये अकोले ४ गुन्हे ४,४२० रुपये आणि शनिशिंगणापूर १ गुन्हा १,५५० रुपये असा एकूण ५,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडल्या.
