खळबळ..शिवसेना मा.जिल्हाप्रमुखांसह दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल १२ ते १५ वर्षांच्या शोषणाचे गंभीर आरोप..
अहिल्यानगर (श्रीरामपूर प्रतिनिधी):-एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना मा.जिल्हाप्रमुख रावसाहेब सदाराम खेवरे यांच्यासह राहुरी येथील दोन डॉक्टरांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.फिर्यादीनुसार,लग्नाचे आमिष दाखवून गेल्या १२ ते १५ वर्षांपासून महिलेचे शोषण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.या कालावधीत संबंधित महिला गर्भवती राहिल्यानंतर राहुरी येथील दोन डॉक्टरांच्या मदतीने गर्भपात घडवून आणल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
खेवरे यांच्यासह डॉ.संजय म्हसे,डॉ.अनंत शेकूकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे.पोलीस निरीक्षक विशाल खैरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
