LCB ची धडक कारवाई अखेर ‘त्या’ चैनस्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश..४ गुन्हे उघड..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-लिंक रोडवरून गायके मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्कुटीवरून जाणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) भांडाफोड केला आहे.या कारवाईत एका आरोपीसह चोरीचा माल स्वीकारणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून,तब्बल ३ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या टोळीच्या चौकशीतून अहिल्यानगर व पाथर्डीतील एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.१ नोव्हेंबर २०२६ रोजी लिंक रोडवरून गायकेमळा रोडने दोन महिला स्कुटीवरून जात असताना एका महिलेच्या गळ्यातील दागिने बळजबरीने हिसकावून चोरण्यात आले होते.याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०३१/२०२६, बीएनएस कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल होता.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.पोउपनि/अनंत सालगुडे व पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.२१ नोव्हेंबर २०२६ रोजी विनोद उर्फ जोल्या जिजाबा भोसले (वय २६,रा.चिखली,ता.आष्टी, जि.बीड) हा केडगाव परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपी विनोद भोसले याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.यामध्ये सुमित नितीन चव्हाण (रा. केडगाव),रोहित नितीन चव्हाण (रा.केडगाव) आणि शुभम गहिनीनाथ भोसले (रा. बेलगाव,ता.कर्जत) हे तिघे आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी अंबादास दगडू पांडुळे (वय ५१, रा.चिखली, ता.आष्टी,जि.बीड) याला दिल्याची माहिती आरोपीने दिली.त्यानुसार पोलिसांनी पांडुळे यालाही ताब्यात घेतले. तपासादरम्यान एकूण ३,२६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/अनंत सालगुडे आणि अंमलदार गणेश धोत्रे,योगेश भिंगारदिवे, अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे,दीपक जाधव,फुरकान शेख,भगवान धुळे यांच्या पथकाने केली.पुढील कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे.
