अहिल्यानगरच्या सहकाराला मिळणार नवे बळ;जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर डॉ.सुजय विखे पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट..
प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीत डॉ.विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद घेत जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विकासाचा रोडमॅप त्यांच्यासमोर मांडला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची सद्यस्थिती, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम व गतिमान आर्थिक पाठबळ देणे, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात बँकेची भूमिका या महत्त्वपूर्ण विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.सुजय विखे पाटील यांचे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि बळीराजाच्या हितासाठी आपल्या नेतृत्वाखाली बँकेच्या माध्यमातून भरीव आणि लोकाभिमुख काम घडावे,” अशा अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.“जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
