एकाच दिवशी ‘एलसीबी’ च्या १६ धडक छाप्यांनी जिल्ह्यात खळबळ..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पाच विशेष पथकांद्वारे एकाच दिवशी १६ ठिकाणी धडक छापे टाकले.कर्जत, तोफखाना,राहुरी,पारनेर आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार,अवैध दारू आणि गुटखा विक्रेत्यांवर ही कारवाई करत १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून,एकूण २ लाख ३ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस अंमलदार अभिजीत अरकल,प्रताप देवकाते,रोहित मिसाळ,भाऊसाहेब काळे, गणेश लोंढे,विशाल तनपुरे, योगेश कर्डीले,अजिनाथ पाखरे,सुयोग सुपेकर,संतोष खैरे,पंकज व्यवहारे,अमृत आढाव,विजय पवार,रिचर्ड गायकवाड,राहुल डोके, भगवान थोरात,सुनिल मालणकर,अतुल लोटके, विष्णु भागवत,अमोल आजबे व प्रकाश मांडगे यांनी केली.
