एलसीबीचा दणका..हॉटेल तुळजाभवानीत चालणाऱ्या हाय-प्रोफाइल जुगार अड्ड्यावर छापा..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध सिद्धटेक परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ (तिरट) जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी ₹४,२७,०९० किमतीचा ऐवज जप्त केला असून १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कर्जत भागात अवैध धंद्यांची माहिती घेत होते.सिद्धटेक येथील ‘हॉटेल तुळजाभवानी’ मध्ये काही जण पैशांवर ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची पक्की माहिती पथकाला मिळाली.पथकाने पंचांसमक्ष हॉटेलवर अचानक धाड टाकली.तेथे दोन वेगवेगळ्या वर्तुळात बसून पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या १२ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले.
चौकशी दरम्यान समजले की सदर जुगाराचा क्लब हा बालाजी राजू चौघुले याचा असून तो जुगारासाठी जागा उपलब्ध करून देत होता. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०६/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, प्रताप देवकाते,अमोल कोतकर,मनोज साखरे, भाऊसाहेब काळे व भगवान धुळे यांनी केली.
