अहिल्यानगर पोलिसांची मोठी कामगिरी हरवलेले तब्बल १९ लाखांचे ८७ मोबाईल शोधून नागरिकांना केले परत..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहर उपविभागातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत हरवलेले किंवा चोरीला गेलेले तब्बल ८७ मोबाईल हँडसेट शोधून काढले आहेत.या सर्व मोबाईलची एकूण किंमत १९,८५,००० रुपये इतकी आहे.दि. ०६/११/२०२६ रोजी अहिल्यानगर शहर उपविभागातील कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत हरवलेले हे मोबाईल,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या उपस्थितीत संबंधितांना परत करण्यात आले आहेत.कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील ५४ मोबाईल (किंमत ₹१४,००,०००/-),तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील २५ मोबाईल (किंमत ₹ ४,००,०००/-) तसेच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील ०८ मोबाईल (किंमत ₹ ८५,०००/-) असे एकूण ८७ मोबाईल १९,८५,०००/-) रुपयांचे नागरिकांना परत करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि.नितीन देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि.बालाजी वैद्य,भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सपोनि.तेजश्री थोरात,पोकॉ.महेश पवार,पोकॉ सचिन बाचकर, पोकॉ.संदिप थोरात यांनी केली आहे.पोलिसांच्या या कामगिरीमुळे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद पाहायला मिळाला आहे.
