Ahilyanagar..गोळीबार प्रकरणाची माहिती थेट संशयितांच्या हातात;मोबाईल सेलचा पोलीस कर्मचारी तात्काळ निलंबित..
अहिल्यानगर प्रतिनिधी (दि. 31 ऑक्टोबर):-शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका महिलेवरील गोळीबार प्रकरणाची माहिती थेट संशयित आरोपींपर्यंत पोहोचल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे,पोलिसांच्या अत्यंत गोपनीय तपासातील माहिती आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) लीक झाल्याचा संशय खुद्द पोलीस खात्यातीलच एका कर्मचाऱ्यावर बळावला आहे.
या गंभीर प्रकरणाची पोलिसी यंत्रणेने तात्काळ गंभीर दखल घेतली असून,पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कठोर पाऊल उचलत पोलीस अंमलदार राहुल गुंडू यास निलंबित केले आहे.निलंबित झालेला राहुल गुंडू हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईल सेलमध्ये कार्यरत होता.खात्यांतर्गतच गोपनीय माहिती बाहेर फुटल्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून,या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
