भिंगार प्रेस क्लबची दिमाखात स्थापना! अध्यक्षपदी बाबासाहेब ढाकणे,उपाध्यक्षपदी स्वप्निल झोडगे,सचिव प्रसाद शिंदे,सहसचिव अमोल भिंगारदिवे व खजिनदारपदी वैष्णवी कदम यांची एकमताने निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भिंगार येथील स्थानिक पत्रकारांची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत पत्रकारांच्या हक्काच्या मंचसाठी ‘भिंगार प्रेस क्लब’ची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला.बैठकीत पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकांमधून भिंगार प्रेस क्लबच्या नव्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष बाबासाहेब ढाकणे,उपाध्यक्ष स्वप्निल झोडगे,सचिव प्रसाद शिंदे,
सहसचिव अमोल भिंगारदिवे व खजिनदारपदी वैष्णवी कदम यांची निवड करण्यात आली.बैठकीत सर्व पदांसाठी अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात नावांचे प्रस्ताव मांडण्यात आले.
अध्यक्षपद बाबासाहेब ढाकणे यांच्या नावाचा प्रस्ताव उमेर सय्यद यांनी सुचवला,ज्याला अनिकेत यादव यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपद स्वप्निल झोडगे यांच्या नावाचा प्रस्ताव मोहसीन कुरेशी यांनी सुचवला आणि गिरीष रासकर यांनी त्यास अनुमोदन दिले.सचिवपद प्रसाद शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव प्रशांत पाटोळे यांनी मांडला,ज्याला स्वप्निल झोडगे यांनी अनुमोदन दिले.सहसचिवपद अमोल भिंगारदिवे यांच्या नावाचा प्रस्ताव बाबासाहेब ढाकणे यांनी सुचवून अनिकेत यादव यांच्याकडून अनुमोदन घेतले.खजिनदारपद वैष्णवी कदम यांच्या नावाचा प्रस्ताव स्वप्निल झोडगे यांनी सूचवला,ज्याला गिरीष रासकर यांनी अनुमोदन दिले.निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
