LCB..ज्या हातांनी म्हातारपणी आधार द्यायला हवा होता,त्याच हातांनी बापाचा खून आरोपी मुलगा जेरबंद..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-ज्या हातांनी म्हातारपणी आधार द्यायला हवा होता,त्याच हातांनी बापाचा घात केल्याची अत्यंत थरारक आणि हादरवून टाकणारी घटना अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी शिवार येथे घडली आहे.दि.२४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री घडलेल्या या नरसंहारामागचे सत्य पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणले असून,खुद्द पोटच्या मुलानेच आपल्या पित्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या खळबळजनक उघडशिडीने संपूर्ण जिल्ह्यात एकच संताप आणि आश्चर्य व्यक्त होत आहे.दि.२४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाकोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ मयत दिलीप करमदास भोसले (वय ४२) यांना अज्ञात हल्लेखोरांनी बेदम मारहाण करून जागीच ठार मारले होते.याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाची चक्रे हलवली.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने एक विशेष तपास पथक तयार केले.तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू केला.यादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार,हा खून बाहेरच्या कोणी-नाही तर मयताचे स्वतःचे मूल अंबर दिलीप भोसले आणि रोहित दिलीप भोसले यांनीच केल्याचे समोर आले.
पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासांत सापळा रचून मुख्य आरोपी अंबर दिलीप भोसले (वय १९, रा. वाकोडी) यास शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून,या रक्ताच्या नात्याला कलंक लावणारा घात नेमका कशामुळे झाला? याचा अधिक तपास आता पोलीस करीत आहेत.ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.संतोष मुटकुळे, सपोनि.हरिश भोये आणि पोलीस अंमलदार अतुल लोटके,फुरकान शेख, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,मनोज साखरे,प्रशांत राठोड व भगवान धुळे यांच्या पथकाने पार पाडली आहे.
