नदीत धाड! संगमनेरात वाळूमाफियांवर एलसीबीचा बडगा;१५ लाखांचा टिप्पर आणि मुद्देमाल जप्त दोघांवर गुन्हा दाखल..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या कठोर आदेशांनंतर,स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुक्यात मोठी धडक कारवाई केली आहे.प्रवरा नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडत पोलिसांनी तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.दि.२४ ऑक्टोबर २०२६ रोजी कासारवाडी-खांडगाव प्रवरा नदीपूल,संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत हि कारवाई करण्यात आली आहे.
सनी संजय चव्हाण (वय १९,रा.साईखिंडी फाटा,संगमनेर),अमोल संजय जोंधळे (वय २७,रा. गुंजाळवाडी,संगमनेर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.या आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३ (२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनांनुसार,पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, अभिजीत अरकल,रणजीत जाधव,दिपक जाधव,विशाल तनपुरे,बाळासाहेब गुंजाळ आणि अजिनाथ पाखरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.
