पुणे पदवीधर:संघर्षाची जाणीव असणारे रुपेश उंबरकर रिंगणात;तरुणांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार!
पुणे (प्रतिनिधी):-“माझ्या पाठीशी कोणत्याही बड्या राजकीय घराण्याचा वारसा नाही;परंतु सामान्य माणसाच्या संघर्षाची पूर्ण जाणीव आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस माझ्यात आहे. पदवीधरांचे हक्क,विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या समस्या विधिमंडळाच्या पटलावर ठामपणे मांडण्यासाठीच मी विधान परिषदेच्या रिंगणात उतरलो आहे,” असा दृढ निर्धार पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार उंबरकर रुपेश शिवाजी (उमेदवार क्र. २२) यांनी व्यक्त केला.सामान्य कुटुंबातून आलेले कणखर नेतृत्व
कोणत्याही राजकीय घराणेशाहीचा पाठिंबा नसताना केवळ जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण घेऊन रुपेश उंबरकर यांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. आज राज्यातील उच्चशिक्षित तरुण बेरोजगारीच्या गर्तेत अडकलेला आहे.भरती प्रक्रियेतील पारदर्शकता,स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि वेळेवर निकाल न लागणे यांमुळे तरुणांमध्ये प्रचंड निराशा आहे.दुसरीकडे शिक्षण व्यवस्थेचा कणा असणाऱ्या शिक्षकांच्या वेतनासह अनेक मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत.या सर्व घटकांना विधिमंडळात एका खऱ्या आणि प्रामाणिक प्रतिनिधीची गरज असल्याचे उंबरकर यांनी स्पष्ट केले.यावेळी ते म्हणाले की,“माझ्याकडे धनशक्ती किंवा राजकीय नेत्यांचे वरदहस्त नसतील,पण प्रामाणिकपणे काम करण्याची ताकद आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी भांडण्याची जिद्द नक्कीच आहे.ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, पदवीधरांच्या स्वाभिमानाची आणि न्याय्य हक्कांची लढाई आहे.
पारदर्शक भरती व रोजगार : शासकीय नोकरभरती पारदर्शक पद्धतीने राबवणे आणि परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर धोरणांची अंमलबजावणी करणे.
शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणे : विनाअनुदानित शाळा, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा करणे.
विद्यार्थी हित केंद्रस्थानी : शैक्षणिक शुल्क, वसतिगृहांच्या सुविधा आणि उच्च शिक्षणातील संशोधनासाठी आवश्यक शिष्यवृत्ती मिळवून देणे.
पदवीधरांचा खरा आवाज : केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता पदवीधरांच्या समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी विधान परिषदेत निरंतर पाठपुरावा करणे.
प्रथम पसंतीच्या मतदानाचे आवाहन पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील सर्व सुजाण आणि विचारवंत मतदारांनी कोणतीही प्रलोभने किंवा राजकीय दबाव झुगारून, उमेदवाराची निष्ठा व कार्यपद्धती पाहून मतदान करावे,असे कळकळीचे आवाहन उंबरकर यांनी केले आहे. मतपत्रिकेवरील उमेदवार क्रमांक २२ समोर प्रथम पसंतीचा ‘१’ हा क्रमांक नोंदवून आपल्या हक्काच्या प्रतिनिधीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
