हिवरगाव पावसा येथे बांधकाम कामगार नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..भाजपा सरचिटणीस केशव दवंगे यांचा पुढाकार
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-हिवरगाव पावसा येथे भाजपा कार्यालयात बांधकाम कामगार नोंदणी शिबिराला कामगारांकडून उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे.या शिबिरामुळे शेकडो असंघटित बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शासकीय योजना आणि मिळणारे आर्थिक लाभ याबद्दल कामगारांमध्ये वाढलेली जागरूकता या प्रतिसादातून दिसून आली.अर्ज भरणे सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी केल्या गेल्याने कामगारांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले.या कमी विशेष पुढाकार आणि बांधकाम कामगार मध्ये जनजागृती संगमनेर तालुका भाजपाचे सरचिटणीस केशव दवंगे यांनी त्यामुळे शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. बांधकाम कामगारांनी शिबिराचा संधीचा लाभ घेत उस्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पावसे आणि तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे यांच्या उपस्थितीत शिबिरास सुरुवात झाली.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत विविध योजनांचे लाभ मिळतात.आर्थिक सहाय्य,कामगारांच्या मुलांना पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत दरवर्षी मोठी शिष्यवृत्ती,गंभीर आजारांच्या उपचारासाठी वैद्यकीय खर्च आणि प्रसूतीसाठी आर्थिक मदत,अपघात विमा,अपंगत्व आल्यास आर्थिक मदत आणि वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शनची सोय,कामगारांना कामासाठी आवश्यक असणारे सुरक्षा किट आणि अत्यावश्यक अवजारांचे मोफत वाटप केले जात आहे. या शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेचे हिवरगाव पावसा येथे भाजपा व महायुती आयोजित शिबिरास बांधकाम कामगार नोंदणी साठी कामगार वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
