दिवाळीच्या तोंडावर खाकीचा दणका..स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.या आदेशाची गांभीर्याने दखल घेत,स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तब्बल ५७ गोवंशीय जनावरांची सुखरूप सुटका केली आहे.या धडक कारवाईत एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर हालचालींवर वचक निर्माण करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते.या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव,तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे,राहुल द्वारके,विजय पवार,राहुल डोके,सतीष भवर,अमृत आढाव,योगेश कर्डीले,रिचर्ड गायकवाड,भगवान थोरात,सुनील मालणकर,बाळासाहेब गुंजाळ व जालींदर साखरे यांचा समावेश होता.
या पथकाला योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन देऊन कारवाईसाठी संगमनेर परिसरात रवाना करण्यात आले होते.दि.०२ नोव्हेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे,पोलीस पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणांवर अचानक छापे टाकले.कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवण्यात आलेल्या लहान-मोठ्या जिवंत जनावरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून,१९ लाख ६०,०००/- रुपये किमतीची ५७ गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी ही अत्यंत महत्त्वाची कारवाई पार पाडली आहे.फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून,या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
