LCB ची मोठी कारवाई..दिवसाढवळ्या घरफोडी करणारी जालन्याची कुख्यात टोळी जेरबंद,तब्बल १७.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील खिलारी वस्तीवर २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ०१.१० वाजण्याच्या सुमारास एका बंद घराचे अनोळखी आरोपींनी कुलूप तोडले. फिर्यादी मंगल संतोष गोरडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ३,०९,०००/- रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१ (३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते.पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरू करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.कृष्णकुमार सेदवाड,अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले,फुरकान शेख,अभिजीत अरकल, भिमराज खर्से,सागर ससाणे,अमोल कोतकर,अमोल आजबे,प्रकाश मांडगे,भगवान सानप,बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड,किरण ठुबे,अरूण मोरे व भगवान धुळे यांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.१ नोव्हेंबर २०२६ रोजी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू असताना पोलिसांना खात्रीशीर टीप मिळाली की,हा गुन्हा कार्तिक प्रकाश आव्हाड (रा. उपजिल्हा रुग्णालय समोर, घनसांगवी,जि.जालना) याने आपल्या साथीदारांसोबत मिळून केला आहे.
पोलिसांनी सापळा रचून कार्तिक प्रकाश आव्हाड (वय २०,रा. उपजिल्हा रुग्णालय समोर, घनसांगवी,जि.जालना),
गणेश प्रकाश आव्हाड (वय २०,रा.उपजिल्हा रुग्णालय समोर,घनसांगवी,जि.जालना),
अभिषेक उर्फ अभि प्रकाश लोमटे (वय २१,रा.शेरेगल्ली, कळंब,ता.कळंब,जि. धाराशिव) अशा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच अर्जुन गणपत गायकवाड,पुजा प्रकाश आव्हाड (दोघेही रा. घनसांगवी,जि.जालना) आणि सुमित विनायक पांजगे (रा. मांगवाडा,घनसांगवी,जि. जालना) यांचा शोध पोलीस कसून घेत आहेत.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 17 लाख 40 आजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींना मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून,पुढील कायदेशीर तपास पारनेर पोलीस करीत आहेत.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.
