LCB च्या धडक कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले..! ५ लाखांचा अवैध गुटखा जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) घेतलेली कठोर भूमिका गुन्हेगारांच्या चांगलीच अंगलट आली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार LCB च्या पथकाने श्रीरामपूर आणि श्रीगोंद्यात केलेल्या ४ धडक छाप्यांमध्ये तब्बल ५,६५,१९६ रुपयांचा विषारी गुटखा आणि सुवासिक तंबाखूचा साठा जप्त केला आहे.ही कारवाई केवळ एका ठिकाणी नसून,एकाच वेळी विविध भागात लावलेल्या सापळ्यात अनेक धंदेवाईक जाळ्यात अडकले आहेत.श्रीरामपूर शहर आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने प्रामुख्याने ही कारवाई केली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार सपोनि.हरिश भोये,पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे,गणेश लोंढे,अभिजीत अरकल, श्यामसुंदर जाधव,प्रताप देवकाते,रणजीत जाधव,मनोज साखरे,अमोल कोतकर,भगवान धुळे यांनी केली आहे.जे आरोपी सध्या फरार आहेत,त्यांचा कसून शोध सुरू असून त्यांच्यावरही लवकरच कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे.अवैध धंदे करणाऱ्यांसाठी हा थेट इशारा मानला जात आहे.
