अमृतवाहिनी सोसायटीतील ७८ वर्षीय वृद्ध नागरिक बेपत्ता;शोध घेण्यासाठी संगमनेर शहर पोलिसांचे आवाहन..
संगमनेर प्रतिनिधी:-संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ७८ वर्षीय वृद्ध नागरिक अचानक घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे.रघुनाथ मारूती भोर (वय ७८ वर्षे,राहणार अमृतवाहिनी गृहनिर्माण सोसायटी,संगमनेर,तालुका संगमनेर,जिल्हा अहिल्यानगर) असे बेपत्ता झालेल्या वृद्धाचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ मारूती भोर हे १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कोठेही न सांगता निघून गेले आहेत.या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०-३ नुसार मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन:
वय: ७८ वर्षे
उंची: ५ फूट ६ इंच
अंगात: क्रीम रंगाची पँट व पांढऱ्या रंगाचा शर्ट
चेहरा व शारीरिक विशेषता: नाक सरळ,केस छोटे पांढरे, पायात चप्पल,मराठी व हिंदी भाषा बोलतात,डोळ्यांना चष्मा आहे.तरी नागरिकांना सदर व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास किंवा आढळल्यास तात्काळ तपासी महिला पोलीस अंमलदार चारुशीला गोणके मोबाईल नंबर ८९९९०८०२४९ तसेच संगमनेर शहर पोलीस स्टेशन फोन नंबर: ०२४२५-२२५३३३ यावर संपर्क करावा.
