अहिल्यानगर पोलिसांचा धडाका:एकाच दिवसात कोम्बिंग ऑपरेशनसह ९ छापे; २ लाख २४ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई करत एकाच दिवशी कोम्बिंग ऑपरेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून धडक मोहीम राबवली.यामध्ये सराईत गुन्हेगार,वॉरंट मधील आरोपी,वाहन तपासणी तसेच दारू आणि जुगाराच्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करत एकूण २,२४,७०५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी आयोजीत करून वाहन तपासणी,ड्रंक ऍ़ण्ड ड्राइव्ह केसेस,तसेच फरार पाहिजे आरोपी,हद्दपार केलेले आरोपी,नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी, हिस्ट्रीशीटर चेक करणेबाबत आदेश दिले.त्याचप्रमाणे कोम्बीग ऑपरेशन दरम्यान अवैध अग्निशस्त्र बाळगणारे, अवैध धंदे करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. अहिल्यानगर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी,स्थानिक गुन्हे शाखा असे एकुण 46 पोलीस अधिकारी,202 पोलीस अंमलदार व 74 होमगार्ड यांचेकडून राबविण्यात आलेल्या कोम्बीग ऑपरेशनमध्ये कारवाई केली आहे.वरील कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक,वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,सोमनाथ वाकचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सपोनि/हरिष भोये,पोउपनि/अनंत सालगुडे,विकास जाधव व पोलीस अंमलदार अतुल लोटके,सोमनाथ झांबरे, अमोल आजबे,प्रकाश मांडगे, अरविंद भिंगारदिवे,योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे, निळकंठ कारखेले,अभिजीत अरकल,किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर,रोहित येमुल,योगेश कर्डीले,अरूण मोरे,शामसुंदर जाधव,अमोल कोतकर,भाऊसाहेब काळे, दिपक जाधव,भगवान धुळे, रमीजराजा आत्तार,रिचर्ड गायकवाड,राहुल डोके, भगवान थोरात,सुनिल मालणकर अशांचे पाच पथके तयार करून जिल्हयातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन,कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.दि. 22/11/2026 रोजी पथकाने पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत जुगार,दारू विक्री करणारे इसमांची माहिती काढुन 9 ठिकाणी छापे टाकुन पोलीस स्टेशनला 9 गुन्हे दाखल करून एकुण 2,24,705/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.वरील कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
