भावी पिढीच्या हाती संविधानाची मशाल! क्रांती चौकात ‘द रिअल पँथर ऑफ इंडिया’तर्फे संविधान प्रती,उद्देशिका आणि शालेय साहित्याचे वाटप..
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची वाट प्रशस्त करणे आणि नवीन पिढीमध्ये संवैधानिक मूल्यांची रुजवणूक करणे,या उद्देशाने ‘द रिअल पँथर ऑफ इंडिया’ संघटनेच्या वतीने क्रांती चौक येथे “संविधान प्रती, उद्देशिका व शैक्षणिक साहित्य वाटप” सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.भारतीय संविधानाच्या गौरवाप्रीत्यर्थ आयोजित या उपक्रमामुळे परिसरात चैतन्याचे आणि प्रबोधनाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन व सोहळ्याची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत करण्यात आली.संघटना प्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष दिनेश गवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संविधानातील समता, स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुता ही मूल्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन केवळ शिक्षणातूनच घडू शकते,त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाप्रमुख रणजीत मनोरे यांनी भूषवले.कामगार विंगचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून मान्यवर व नागरिकांचे स्वागत केले.या यशस्वी सोहळ्याचे मुख्य निमंत्रक प्रदेश महासचिव अरशाद लखपती हे होते. यावेळी मराठवाडा अध्यक्ष सुनील खरात,राज्य संघटक जयनाथ बोर्डे, सामाजिक न्याय विभागाचे राज्य महासचिव सुरेश दाभाडे, कामगार विंगचे मराठवाडा अध्यक्ष संतोष उणवणे आणि युवा मराठवाडा अध्यक्ष जहीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मानसीताई म्हस्के,जिल्हा सरचिटणीस अमित मोरे, कामगार विंगचे जिल्हा सचिव पांडुरंग सोनटक्के,शहर उपाध्यक्ष गंगापुरकर,शहर सचिव कपिल गिरी आणि पूर्व शहर अध्यक्ष गणेश गौरय्ये यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.संविधानाची उद्देशिका, संविधानाच्या प्रती आणि शालेय साहित्य मिळाल्याने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.या सोहळ्याला रत्नाकर खंडागळे, अँड.प्रवीण जाधव,इमरान भाई,हन्नु नाना,हाजी नौशाद भाई, बादशाह लखपती, मिलिंद सोनवणे,कार्तिक पुजारी,विशाल कांबळे,विनोद म्हस्के,हाजी शहजाद भाई, शाहीर अशोक शिरसाठ, शाहिद लखपती,आसिफ शेठ, गौतम पवार,संदीप बनकर, आमेर भाई,अल्ताफ बिल्डर, फजल लाला,शाकेर जेके, अमजद खान,बाबर खान, गणेश भाऊ,अकबर खान, फैजान लाला,होझेफ लाला, राज भाईजी,आवेस भाई, अन्सार भाई,विलास साळवे, मंदाकिनी ढाकणे,माधुरी जाधव,शिरसाट सर,कैलास सोनवणे,अफरोज खान, सोफियान भाई,सल्लू भाई, करीम शेख,बिलाल नवाब, इस्माईल आप्पा,सादिक भाई, उमान शेख,कयूम भाई, कलीम भाई, कलीम पटेल,विकार भाई, सलमान भाई, साहिल लखपती, रेहान भाई,अरबाज भाई, इबाद सेठ, ममशाद लखपती, दिलशाद लखपती, सफान भाई, सलीम भाई आणि रिजवान भाई यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
