छत्रपती संभाजीनगरमध्ये भीमगर्जना..! ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’चा उपवर्गीकरणाला कडाडून विरोध..निळ्या गुलालाची उधळण अन् ढोल-ताशांचा गजरात ‘भीम रॅली’.. ३० एप्रिलपर्यंत कोट्यवधी ई-मेल करण्याचे समाजाला आवाहन
छत्रपती संभाजीनगर (१५ एप्रिल प्रतिनिधी):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहरात ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’ च्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य ‘भीम रॅली’ने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.फटाक्यांची आतिषबाजी आणि निळ्या गुलालाच्या उधळणीत निघालेल्या या रॅलीने केवळ उत्सवाचा रंगच भरला नाही, तर अनुसूचित जातीतील ‘उपवर्गीकरणाच्या’ निर्णयाविरोधात कडाडून एल्गार पुकारला.
🔷 निळा जनसागर अन् रॅलीचा मार्ग
अशोक सम्राट चौक (मोंढा) येथून या रॅलीचा प्रारंभ अत्यंत उत्साहात झाला. क्रांती चौक, सिल्लिखाना,पैठण गेट, औरंगपुरा,मिल कॉर्नर अशा मुख्य मार्गांवरून ही रॅली मार्गस्थ होताना हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग आणि शेकडो वाहनांच्या ताफ्यामुळे संपूर्ण शहर ‘भीममय’ झाले होते.रॅलीचा समारोप भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
🔷 ‘उपवर्गीकरण’ मान्य नाही; ३० एप्रिलपर्यंत आंदोलनाची हाक
या रॅलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आरक्षणामधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला दर्शवलेला तीव्र विरोध.रॅलीत कार्यकर्त्यांच्या हातात असलेले निषेधाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
पक्षाच्या वतीने समाजाला आवाहन करण्यात आले की:
उपवर्गीकरणाचा निर्णय हा समाजाच्या एकसंधतेला तडा देणारा आहे.या अन्यायाविरुद्ध प्रशासनाकडे आपला विरोध नोंदवण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त संख्येने (कोट्यवधींच्या घरात) ई-मेल पाठवावेत.”
🔷 नेतृत्व आणि प्रमुख उपस्थिती
या भव्य रॅलीचे नेतृत्व पक्षाचे प्रमुख राजूभाई साबळे यांनी केले. यावेळी पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते,
राज्य उपाध्यक्ष: ॲड. अविनाश थिट्टे
राज्य सचिव: दिनेश गवळे
मराठवाडा उपाध्यक्ष: सुनील खरात
जिल्हा उपाध्यक्ष: अरशाद लखपती
जिल्हा सरचिटणीस: रवि मोरे
शहराध्यक्ष: रणजीत मनोरे,तसेच प्रकाश घोरपडे, सुरेश कांबळे, अनिस गंगापूरकर, संतोष उनवणे, प्रदीप धनेधर, मोहन गायकवाड, शेख शाहिद, राज लखपती, गुड्डू लखपती, हाजी नौशाद लखपती, इमरान भाई, आरिफ सय्यद, शहजाद भाई, बादशाह लखपती, गणेश गौरये, अन्सार भाई, राऊफ सय्यद, बाबर खान, अमजद भाई, रिजवान शेख, सोनू भाई, आसिफ शेट, शाहू भाऊ, शाकीर जेके, अफजल लाला, रेहान सेठ, सोफियान भाई, अखिल भाई, बिडकीन बब्बू भाई, इस्माईल आप्पा, शाहिद लखपती, वाजिद भाई, अकबर खान, कलीम भाई, आवेस भाई, सोहेल भाई, राज भाईजी आणि जयेश साबळे मित्र मंडळ व लखपती परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔷 चिमुकल्या रणरागिणींचे ढोल-ताशा वादन
भडकल गेट येथे रॅली पोहोचताच बौद्धिसत्व प्रतिष्ठान व ढोल ताशा पथकातील (इंदिरा नगर, गारखेडा) लहान मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संस्थापक अध्यक्ष सुमित केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींनी अत्यंत शिस्तबद्ध आणि जोमदार ढोल-ताशा वादन करत बाबासाहेबांना आगळीवेगळी मानवंदना दिली. त्यांच्या कलेचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.
🔷 सामाजिक भान आणि शिस्त
पक्षाच्या वतीने केवळ रॅलीच काढण्यात आली नाही, तर सामाजिक बांधिलकी जपत भडकल गेट परिसरात उपस्थित जनसमुदायासाठी अन्नदान आणि पाणी वाटपाचे चोख नियोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनाने आगामी काळात उपवर्गीकरणाविरोधातील संघर्षाची दिशा स्पष्ट केली आहे.
