प्रगतीचे नवे शिखर..! माजी जिल्हापरिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या ताफ्यात आलिशान वेलफायर वाहन दाखल..माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांकडून कौतुकाची थाप
संगमनेर (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-आपल्या जनसंपर्काच्या जोरावर आणि सामाजिक कार्याच्या कल्पकतेने जनमानसात वेगळी ओळख निर्माण केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य व खंबीर नेतृत्व महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.त्यांच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या आलिशान ‘टोयोटा वेलफायर’ या नवीन वाहनाचा पूजन सोहळा राज्याचे माजी महसूलमंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय ना.बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला.थोरात साहेबांकडून शुभेच्छांचा वर्षाव यावेळी ना. बाळासाहेब थोरात यांनी गोडगे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. “महेंद्रशेठ यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सक्रियता वाखाणण्याजोगी आहे. हे नवीन वाहन त्यांच्या जनसेवेच्या प्रवासाला अधिक गती देणारे ठरेल,” असा विश्वास व्यक्त करत थोरात साहेबांनी गोडगे पाटील व त्यांच्या परिवाराला पुढील यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
उत्साही वातावरण आणि मित्र परिवाराची मांदियाळी या सोहळ्याचे निमित्त साधून महेंद्रशेठ गोडगे पाटील यांचा मोठा मित्र परिवार,राजकीय क्षेत्रातील दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या प्रगतीचा आनंद प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तालुक्यातील राजकारणात आणि समाजकारणात महेंद्रशेठ गोडगे पाटील यांचे नाव आदराने घेतले जाते.सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या प्रगतीबद्दल उपस्थित मान्यवरांनी आणि हितचिंतकांनी त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
