निळा झंझावात’! मुकुंदनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची डरकाळी..शाखा फलकाचे दिमाखदार अनावरण..
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’ या पक्षाचा शहरात झपाट्याने विस्तार होत असून, मुकुंदनगर (रेल्वेगेट नंबर ५६), मुकुंदवाडी येथे नवीन शाखा नामफलकाचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले.पक्षाचे मुख्यनेते राजूभाई साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि राज्य उपाध्यक्ष अॅड.अविनाश थिट्टे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.नूतन कार्यकारणीची घोषणा या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे मुकुंदनगर परिसरातील सक्रिय कार्यकर्त्यांची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रविकांत मोरे आणि नवनियुक्त कामगार आघाडी शहराध्यक्ष संतोष उनवणे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली खालील पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
अध्यक्ष पायलट मोरे,उपाध्यक्ष अतुल सोनवणे,सचिव करण सोनवणे,कोषाध्यक्ष सुमित मोरे,सल्लागार रवींद्र जाधव,सदस्य सम्राट मोरे,योगेश उनवणे,किरण वाघमारे,कार्यक्रमाला मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, अशोक गायकवाड,जयनाथ बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर,हनु नाना,कलीम खान,गणेश गौरये यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.जनसामान्यांच्या प्रश्नांना मिळणार वाचा शाखा अनावरणानंतर बोलताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की, “आगामी काळात या शाखेच्या माध्यमातून मुकुंदनगर परिसरातील जनसामान्यांच्या अडीअडचणी आणि नागरी प्रश्न सोडवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल.”या कार्यक्रमामुळे मुकुंदवाडी परिसरात पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
