अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची विक्रमी भरारी; २०२५-२६ मध्ये ७ कोटी ९६ लाखांचा निव्वळ नफा चेअरमन सौ.सरस्वती घुले यांची माहिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ७ कोटी ९६ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत विक्रमी कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर सभासदांना ६.१० टक्के लाभांश (डिव्हिडंड) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.बँकेच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बँकेच्या चेअरमन सरस्वती घुले यांनी ही माहिती दिली.२०२५ रोजी बँकेच्या ठेवी १५३३ कोटी रुपये होत्या,त्यात एका वर्षात ९९ कोटी रुपयांची वाढ होऊन ३१ मार्च २०२६ अखेर एकूण ठेवी १६३३ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत.सभासदांच्या कायम ठेवींवर ७ टक्के व्याज ३१ मार्च रोजीच जमा करण्यात आले आहे.बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी राज्य कार्यक्षेत्रा संदर्भातील पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव आगामी वार्षिक सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.बँकेची कर्जाची मर्यादा ४७ लाखांवरून ५२ लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून, पगारदार संस्थांमध्ये बँकेचा कर्जाचा व्याजदर सर्वात कमी व स्थिर ठेवण्यात आला आहे.सभासदांच्या सोयीसाठी यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,२ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथील सुखकर्ता लॉन्स येथे होणार आहे.विशेष म्हणजे,तब्बल २५ वर्षांनंतर महिला चेअरमनच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडत आहे.यावेळी पत्रकार परिषदेस गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे, जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे, संघाचे जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर,अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात,दत्ता पाटील कुलट,विद्याताई आढाव,मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप,गणेश पाटील यांच्यासह बँकेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व सभासद बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित राहून आपल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करावी, असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
