ज्या डॉक्टरावर रुग्णांनी आणि भागीदारांनी डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानेच केला खेळ तब्बल चार वर्षापासून फरार असलेला ‘तो’ डॉक्टर कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-ज्या डॉक्टरावर रुग्णांनी आणि भागीदारांनी डोळे झाकून विश्वास ठेवला,त्यानेच असा काही खेळ रचला की ऐकून थक्क व्हाल! केडगाव शिवारात ‘सुविधा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल’ सुरू करण्याच्या नावाखाली तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या भामट्या डॉक्टरला कोतवाली पोलिसांनी ४ वर्षांनंतर बेड्या ठोकल्या आहेत.पुण्यातील मांजरी येथील रहिवासी अक्षय दत्तात्रय ढवळे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार नगर-पुणे हायवेवर केडगाव येथे लॅब सुरू करण्याचे आमिष दाखवून आरोपी डॉक्टरने ६ लाख रुपयांचा चेक आणि ४ लाख रुपये रोख, असा एकूण १० लाख रुपयांचा व्यवहार केला.५ वर्षांचा करारनामा करून काही दिवसांतच हॉस्पिटल बंद पाडले.एवढेच नाही तर लॅबमधील ६,५६,५०० रुपयांच्या महागड्या वस्तू आणि डिपॉझिटचे १०,००० रुपये घेऊन डॉक्टर पसार झाला.डॉ.रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (रा.सोईट,ता. उमरीखेड,जि.यवतमाळ) असे या गुन्हेगार डॉक्टरचे नाव आहे.
२०२२ मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता.गेल्या ४ वर्षांपासून पोलीस आरोपीच्या मागावर होते.पोलीस अधीक्षक यांच्या ‘पाहिजे फरार आरोपी शोध मोहीमे’ अंतर्गत कोतवाली पोलिसांना अत्यंत गोपनीय बातमी मिळाली आरोपी डॉ.रामेश्वर बंडगर हा ३० जुलै २०२६ रोजी काही कामानिमित्त अहिल्यानगर शहरात येणार आहे.माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक सक्रीय झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत गोपनीयतेने जाळे विणले (Trap) आणि तो शहरात पाऊल ठेवताच शिस्तबद्ध कारवाई करत त्याला रंगेहात पकडले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कालूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे,पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख,पोलीस अंमलदार विशाल दळवी,विनोद बोरगे,बाळकृष्ण दौंड,साबीर शेख,राहुल शिंदे,रोहिणी दरंदले,वर्षा पंडित,सुरज कदम,दीपक रोहकले,सत्यजित शिंदे,रमेश शिंदे,अतुल कोतकर,सचिन लोळगे,अमोल गाडे,अतुल काजळे,शिरीष तरटे,अतुल कोतकर,संकेत धिवर,राहुल मासाळकर,गंगाधर आंग्रे, पल्लवी रोहकले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू व अरुण सांगळे यांनी केली आहे.
