अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणारा शातीर चोर शेवटी लागलाच गळाला एमआयडीसी पोलिसांनी 9 गाड्यासह घेतला ताब्यात..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर दि.30 जुलै):-शहरातून एकामागून एक गाड्या गायब करणाऱ्या एका भामट्याने पोलिसांची झोप उडवली होती.पण,एका छोट्याशा चुकीमुळे हा शातीर भामटा थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.डोंगरगण येथील रामेश्वर मंदिर परिसरातून आबासाहेब तुळशीराम आढाव यांची डिस्कव्हर गाडी अचानक गायब झाली.त्यांनी तात्काळ एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धाव घेतली.प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले.
सपोनि.हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज पिंजून काढले.तांत्रिक विश्लेषण आणि बारीक तपासाअंती पोलिसांच्या हाती एक धक्कादायक नाव लागलं,रामदास बाबासाहेब ससाणे (वय ३१,रा.कत्रड,ता. राहुरी),पोलिसांनी थेट त्याच्या घरावर छापा मारून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्हा कबूल केलाच,पण त्याच्याकडून तब्बल ०९ महागड्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.हेमंत थोरात आणि त्यांच्या टीमने केली आहे.
