रात्रीच्या अंधारात प्रवाशांना लुटणाऱ्या ‘त्या’ सराईतास भिंगार कॅम्प पोलिसांनी उसाच्या शेतातून उचलला..
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-नगर-जामखेड रस्त्यावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे! रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या एका सराईत भामट्याचा पोलिसांनी असा काही गेम वाजवला आहे, ज्याचा विचारही आरोपीने केला नसेल.नगर-जामखेड रोडवरील वृंदावन मंगल कार्यालयासमोर २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास एका प्रवाशाची अडवणूक करून त्याला शिवीगाळ,दमदाटी व मारहाण करत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि तयार कोळसा बळजबरीने चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती.याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८४/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५)) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना अत्यंत महत्त्वाची टीप मिळाली.या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी हा तिसगाव (ता. पाथर्डी) येथील एका उसाच्या शेतात लपून बसल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ तिसगाव शिवारात धाव घेतली.
पोलीस आल्याचा सुगावा लागताच आरोपीने शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र,सतर्क पथकाने त्याचा थरारक पाठलाग करून त्याला जागीच पकडले आणि ताब्यात घेतले.तपासा दरम्यान पकडलेल्या आरोपीने आपले नाव महादेव आप्पासाहेब घावटे (वय ३२,रा.मांडवे,ता. पाथर्डी,जि.अहिल्यानगर) असे सांगितले असून त्याने या रस्तालुटीच्या गुन्ह्याची थेट कबुली दिली आहे.हि कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे (नगर शहर भाग) यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहा.पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात,पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार,पोलीस अंमलदार दीपक शिंदे,रविंद्र टकले, रामनाथ डोळे,कैलास शिरसाठ,प्रमोद लहारे,वैभव झिने दक्षिण मोबाईल सेलचे अरुण सांगळे यांनी केली आहे.
