Maharashtra247

नगरमध्ये पुन्हा अँटी करप्शनचा ट्रॅप दोघांना रंगेहात लाच स्वीकारताना पकडले

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० मार्च):-*यशस्वी सापळा अहवाल*

▶️ *युनिट -* अहमदनगर

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-६३ वर्ष, रा- नेवासा खुर्द ता: – नेवासा, जि.अ’नगर

▶️ आरोपी- १) किसन दिंगबर सागर, वय ५५, धंदा – नौकरी, विशेष लेखा परीक्षक, वर्ग २, नेमणुक- जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालय, सहकारी संस्था, अहमदनगर.

राहणार-लक्ष्मी कॅालनी, गट नं १८४, सातारा परिसर , जि.छत्रपती संभाजीनगर.

२) तय्यब वजीर पठाण वय ४८, खाजगी लेखा परीक्षक, राहणार जवळे खुर्द तालुका नेवासा.

▶️ *लाचेची मागणी-* ३०००००/-₹

तडजोड अंती मागणी – २०००००/- ₹

▶️ *लाचेची मागणी तारीख-* १७/०३/२०२३

▶️ *लाच स्विकारली रक्कम* – १०००००/-₹

▶️ *लाच स्विकारली तारीख-*२०/०३/२०२३

▶️ *लाचेचे कारण* – यातील तक्रारदार हे एका पतसंस्थेचे चेअरमन होते, सदर पतसंस्थेचे लेखापरीक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी लेखापरीक्षक यातील आरौपी लौकसेवक यांना दिले होते. आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांचा नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविणे साठी व लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे कडे ₹ ३०००००/- ची मागणी केल्याबाबत ची तक्रार तक्रारदार यांनी दिलेवरुन दिनांक १७/०३/२०२३ रीजी पंचासमक्ष केलेल्या लाच पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचा कडे तडजोड अंती ₹ २०००००/- ची मागणी आरोपी क्र २ याचे उपस्थितीत केली. मागणी दरम्यान आरोपी क्र २ यांनी प्रोत्साहन दिले. तक्रारदार यांनी मागणी केलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात ₹ १०००००/- देण्याची विनंती केली व सदर लाच रक्कम आज रोजी बाळूमामा ज्युस सेंटर , नेवासा फाटा येथे पंचासमक्ष स्विकारली असता आरोपी लोकसेवक क्र १)यांनी आरोपी क्र २) यांचे उपस्थितीत स्विकारली असता दोन्ही आरोपी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

▶️हॅश व्हॅल्यू, फोटोग्राफ्स घेण्यात आले आहेत

▶️ **सापळा अधिकारी:- हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला प्र वि अहमदनगर*

▶️ *सापळा पथक* :- पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हरुन शैख, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड

▶️ **मार्गदर्शक* –

*मा. शर्मिला वालावलकर मॅडम,पोलीस अधीक्षक

*मा.श्री नारायण न्याहळदे सो.

अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक.

मा. नरेंद्र पवार सौ वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी* मा.सहकार सचिव, सहकार व पणन विभाग,मंत्रालय मुंबई.

You cannot copy content of this page