पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे व वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहर उपाध्यक्षा सुकेशनी गोधने यांनी वाकोडे व सूर्यवंशी कुटुंबीयांची सांत्वनपर घेतली भेट
परभणी प्रतिनिधी:-परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी झालेल्या घटनेत विद्यार्थी आंदोलक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा आंदोलना दरम्यान पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला म्हणून विविध पक्षाने पोलिसांनी विरोधात राज्यभर आंदोलन केले होते.
तसेच लोकनेते विजय बाबा वाकोडे यांचेही या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.या घटनेमुळे संपूर्ण देशभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध पक्षातर्फे आंदोलन झाले होते.
त्यातच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा लघुउद्योग महामंडळ उपाध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांनी विजय बाबा वाकोडे व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले व त्यांच्या परिवारास सांत्वनपर भेट दिली. यावेळी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला शहर उपाध्यक्षा सुकेशनी संभाजी गोधने,ॲड.सिद्धांत गायकवाड,अर्जुन लक्ष्मण मुधळकर, अनिल नरवाडे,कुंदन राणा ठाकूर,श्याम सुंदर काळे,संदीप खंडागळे, विजय खंडागळे,संजय वाघमारे,राहुल धबाले इ. उपस्थित होते.