अहिल्यानगर एलसीबीची दणदणीत कामगिरी..खून,दरोडे,चोरी,शस्त्रसाठा,गोहत्या,NDPS कारवाईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी राज्यस्तरावर सन्मानित
अहिल्यानगर (दि.१० फेब्रुवारी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई करत खून,दरोडा,जबरी चोरी,चैनस्नॅचिंग,घरफोडी,चोरी, दरोड्याची तयारी,आर्म ऍक्ट, गोमांस व गोहत्या प्रतिबंधक कायदा,NDPS,अवैध गुटखा व वाळू तस्करी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार दशरथ कबाडी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल राज्याचे अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन, प्रशिक्षण व खास पथके) महाराष्ट्र राज्य,मुंबई श्री.कृष्णप्रकाश यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ९ खुनाच्या गुन्ह्यांत २० आरोपी,७ दरोड्यांच्या गुन्ह्यांत ३९ आरोपी,जबरी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणून ५५ आरोपी,चैनस्नॅचिंगचे ६ गुन्हे उघडकीस आणून १२ आरोपी,घरफोडीचे ५० गुन्हे उघडकीस आणत ६० आरोपी, तर चोरीचे ४४ गुन्हे उघडकीस आणून ९० आरोपींना अटक केली आहे.तसेच दरोड्याची तयारी करणाऱ्या १५ आरोपीं विरुद्ध ३ गुन्हे दाखल,आर्म ऍक्टन्वये ११ गुन्हे दाखल करून १५ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १६ गावठी कट्टे व ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.गोमांस व गोहत्या प्राणीसंरक्षण कायद्यान्वये २४ गुन्हे दाखल करून ८० आरोपींवर कारवाई, अवैध गुटख्याचे ३५ गुन्हे – ६१ आरोपी, अवैध वाळूचे १६ गुन्हे – ३० आरोपी, तसेच NDPS अंतर्गत ४ गुन्हे – १४ आरोपी यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.अहिल्यानगर जिल्हाभरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत कायद्याचा धाक निर्माण केल्याबद्दल पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या कामगिरीचे श्री.कृष्णप्रकाश यांनी विशेष कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
या सन्मान सोहळ्यावेळी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनीही पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करत कौतुक केले.यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
