Politics..शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी संभाजी अशोकराव कदम यांची नियुक्ती
अहिल्यानगर (दि.१० प्रतिनिधी):-अहिल्यानगर (शिंदे गट) शहर शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी संभाजी अशोकराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीचे अधिकृत पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी संभाजी कदम यांना प्रदान केले.शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार, तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य आपण सक्रियपणे करणार असल्याचे संभाजी कदम यांनी यावेळी सांगितले.ही नियुक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून,अहिल्यानगर शहर (कार्यक्षेत्र) येथे शिवसेना पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याची जबाबदारी संभाजी अशोकराव कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे, हिंदुत्वाचा विचार आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन कार्य करणार असून,पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहू,असा विश्वास संभाजी कदम यांनी यावेळी व्यक्त केला.या नियुक्तीमुळे अहिल्यानगर शहरातील शिवसेना संघटन अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी व्यक्त केला.तसेच आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने जनतेपर्यंत पोहोचेल,असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
