मानाच्या संगमनेर होलम काठी चे देवगड खंडोबा येथे उत्साहात स्वागत..खंडोबा भक्त सोमनाथ शिवाजी गुंजाळ यांच्याकडून महाप्रसादाचे दान
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-सदानंदाचा येळकोट,’ ‘भैरवनाथांचं चांगभल’ अशा जयघोषात संगमनेर येथील जेजुरीला जाणाऱ्या मनाच्या होलम काठीचे आगमन देवगड, हिवरगाव पावसा येथे झाले. ग्रामस्थांच्या वतीने होलम काठीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.जेजुरी येथे माघ पौर्णिमेस होणाऱ्या यात्रेनिमित्त मानाच्या शिखर काठ्यांच्या मिरवणुकीत संगमनेर येथील होलम काठी 800 वर्षांपासून आजपर्यंत संगमनेर येथून जात असते.या मानाच्या होलम काठीचे माघ पौर्णिमा यात्रे नंतर येथे आगमन झाले.यावेळी भंडाऱ्याची उधळण करत ग्रामस्थांनी या मानाच्या होलम काठीचे स्वागत केले.यावेळी या काठी पालखीच्या आरतीचा कार्यक्रम झाला.त्यानंतर श्री.क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि भाजीपाला व्यापारी सोमनाथ शिवाजी गुंजाळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे यांच्या वस्ती येथे होलम काठीचे स्वागत केले व सर्व भाविक भक्तांना चहा, अल्पोहार देण्यात आला.
यावेळी मनाची होलम काठी व पालखीची पारंपरिक संवाद्य मिरवणुक काढण्यात आली.मल्हारी मार्तंड होलम भक्त सार्वजनिक मंडळाचे प्रमुख भाऊसाहेब भिकाजी सातपुते,तुकाराम काठे यांच्या सह होलम काठी व पालखीत सहभागी असलेले भक्त मंडळींचे स्वागत व सत्कार श्री.क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आला. तसेच दोन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सव ते होलम काठी या सर्व कार्यक्रमांकरिता यावर्षी दर्शन व्यवस्था,स्टॉलधारकांचे उत्कृष्ट नियोजन,गर्दीचे नियंत्रण,पार्किंग व्यवस्था,वाहतूक व्यवस्था यांचे उत्कृष्ट नियोजन तालुका प्रशासन,पोलीस प्रशासन,श्री.क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान ट्रस्ट,यात्रा उत्सव समिती,व ग्रामस्थांनी केल्यामुळे भाविकांचा आनंद द्विगुणित झाला त्याबद्दल देवगड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सर्वांचे आभार मानले.बाबासाहेब पावसे (अध्यक्ष),अनिल गडाख (सचिव),संतोष पावसे(उपाध्यक्ष),अण्णासाहेब शिंदे (खजिनदार),सोमनाथ पावसे (विश्वस्त),गणेश गडाख (विश्वस्त),मधुकर शिंदे (विश्वस्त),विकास पावसे (विश्वस्त),अमिरत येरमल (विश्वस्त),सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे, सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,वृक्षमित्र गणपत पावसे,संपादक यादवराव पावसे,गायक हरिचंद्र भालेराव, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
