अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-राहुरी येथे जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) करणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून आरोपीकडून एकूण 6 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
यातील फिर्यादी सौ.आशा नंदकुमार जंगम, (रा.छत्रपती शिवाजी महाराज चौक,राहुरी) या राहुरी येथे किराणा दुकानामध्ये खरेदी करत असताना अज्ञात दोन आरोपीतांनी त्यांचे गळयातील सोन्याचे मिनी गंठण जबरीने तोडून,आरोपी हे मोटार सायकलवरून पळून गेले.याबाबत राहुरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 1209/2024 बीएनएस कलम 309 (4) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जबरी चोरीचे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,संतोष लोढे, फुरकान शेख,संदिप दरंदले,रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, आकाश काळे, भाऊसाहेब काळे,सागर ससाणे,प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.तपास पथकाने घटनाठिकाणचे परिसरात सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाच्या तपासात आरोपी नामे सचिन लक्ष्मण टाके, (रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) याने त्याचे साथीदारासह गुन्हा केल्याचे निष्पन्न केले.निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत आरोपी हे आसणे वस्ती, माळवाडी,ता.श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आसणे वस्ती, माळवाडी,श्रीरामपूर येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन,त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन लक्ष्मण टाके,वय 33, रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर हल्ली रा.आसणेवस्ती, माळवाडी,ता.श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन,वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार राजेंद्र उर्फ पप्पु भिमा चव्हाण, रा.खटकळी,बेलापूर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर (फरार) याचेसह केल्याची माहिती सांगीतली.
तसेच साथीदारासह यापुर्वी राहुरी,लोणी व संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंग केल्याच्या सांगीतलेल्या माहितीवरून राहुरी, लोणी व संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील खालीलप्रमाणे 06 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 राहुरी 1209/2024 बीएनएस 309 (4)
2 राहुरी 1274/2024 बीएनएस 304 (2)
3 लोणी 667/2024 बीएनएस 309 (4)
4 लोणी 684/2024 बीएनएस 309 (4)
5 लोणी 708/2024 बीएनएस 309 (4)
6 संगमनेर शहर 1005/2024 बीएनएस 309 (4)
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.