अहिल्यानगर (दि.११ फेब्रुवारी प्रतिनिधी):-शहरातील माळीवाडा बसस्टॅण्ड परिसरात अश्लील हावभाव करून व अश्लील गाणी म्हणत सार्वजनिक ठिकाणी वातावरण दुषित करणाऱ्या ११ महिलांवर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईमुळे बस स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोतवली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार शहरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, माळीवाडा बसस्टॅण्ड परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे पाहून अश्लील हावभाव करत आहेत तसेच अश्लील गाणी म्हणत आहेत.
माहितीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार कोतवाली पोलीस स्टेशनचे सपोनी.तेजश्री थोरात,मपोसई. मुगडे,पोसई.प्रविण पाटील, मपोहेकॉ.रोहिणी दरंदले,मपोकॉ. पंडित,मपोकॉ.दिख्खत व तपास पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता काही महिला प्रत्यक्ष अश्लील हावभाव करत व अश्लील गाणी म्हणताना आढळून आल्या.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तेथे उभ्या असलेल्या ११ महिलांना ताब्यात घेतले व त्यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.याप्रकरणी मपोहेकॉ.रोहिणी दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. १०१/२०२६ अन्वये बीएनएस कलम २७१, २९२, २९६ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनी.तेजश्री थोरात, मपोसई मुगडे,पोसई. प्रविण पाटील,सफौ.संतोष बनकर,पोहेकॉ.विशाल दळवी, पोहेकॉ.विनोद बोरगे,मपोहेकॉ. रोहिणी दरंदले,पोना विजय ठोंबरे,मपोकॉ पल्लवी रोहेकले, मपोकॉ.वर्षा पंडित,मपोकॉ. दिख्खत,पोकॉ अभय कदम, पोकॉ.दिपक रोहकले,पोकॉ. दत्तात्रय कोतकर,पोकॉ.सुरज कदम,पोकॉ सत्यम शिंदे,पोकॉ. रमेश शिंदे,पोकॉ.सोमनाथ राऊत आदींचा समावेश होता.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अश्लील कृत्य करून वातावरण बिघडविणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
