स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई तब्बल २४० नायलॉन मांजाचे रिळ जप्त;नागरिकांनी नायलॉन मांज्याची खरेदी करू नये एसपी राकेश ओला यांचे नागरिकांना आवाहन
अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्या नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व जिल्ह्याच्या सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आगामी होणाऱ्या मकर संक्रातीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दी पक्षी,प्राणी व मानवी जीवितास इजा करणारा व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला प्लास्टिक, चायना व नायलॉन मांजा विक्री करणारे इसम दुकानदार यांच्यावर छापा टाकून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमूद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने नगर शहरातील रेल्वेस्टेशन कडे जाणाऱ्या लोखंडी पुलाजवळ असणाऱ्या पत्राच्या गाळ्यामध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असताना एकास पकडले त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दर्शन दिनेश परदेशी असे सांगितले झडती घेतली असता दुकानामध्ये १ लाख २० रू.किमतीचे तब्बल २४० रीळ जप्त केले. ताब्यात घेण्यात आलेले इसमाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात रवींद्र तुकाराम घुंगासे ने. स्थानिक गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संदीप पवार,विश्वास बेरड, पंकज व्यवहारे,संदीप दरंदले,रवींद्र घुंगासे, उमाकांत गावडे यांनी केली आहे.