Maharashtra247

विधवा महिलेस व तिच्या मुलास २० ते २५ जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण दिली जीवे ठार मारण्याची धमकी;गुन्हा दाखल होऊन आरोपी अद्यापही मोकाटच

 

भिवंडी प्रतिनिधी:-भिवंडी शहरातील भाग्यनगर कामतघर कमल निवास येथील रहिवासी असणाऱ्या विधवा महिलेस व तिच्या मुलास २० ते २५ जणांच्या टोळक्याने लाकडी बॅट बांबूने बेदम मारहाण करत जखमी केले असून तसेच त्यांच्या चारचाकी वाहनांची नुकसान करत तोडफोड करत घरात बळजबरीने घरात शिरून खिडक्यांच्या काचेची तोडफोड केली आहे.

पहा व्हिडिओ मारहाणीचा

हि घटना दि.१९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.कमल भीमराव शिरसाट,साईनाथ भीमराव शिरसाठ असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.कमल भीमराव शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य अशोक पाईकराव,नाना,अशोक पिंट्या,संगीता,सिद्धार्थ,गणेश,मयूर,विकी शितोळे,चेतन सरदार व इतर ७ ते ८ जणांविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२६७/२०२४ बीएनएस ३३३,११८(१),११५(२),३५२,३५१(२),३२४(४),१८९(१),१९१(२),१८९(३),१९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होऊन आज ३ दिवस झाले आहे तरी अद्यापही आरोपी अटक नाही इतका गंभीर गुन्हा दाखल असताना आरोपी परिसरात मोकाट फिरतायेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.

You cannot copy content of this page