वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा न मिळाल्याने एकाने घेतली गळफास;सख्ख्या भावाच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या आत्महत्या केलेल्या इसमाच्या पत्नीने केला गुन्हा दाखल
संगमनेर प्रतिनिधी दि.१९ एप्रिल):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि.१७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथे उघडकीस आली आहे.ज्ञानदेव देवराम जोर्वेकर (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तुकाराम देवराम जोर्वेकर (रा. रहीमपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.त्याच्या विरुद्ध मृत ज्ञानदेव जोर्वेकर यांच्या पत्नी अनिता ऊर्फ अन्नपूर्णा ज्ञानदेव जोर्वेकर (रा.जोर्वेकर वीटभट्टी,जुने रहीमपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीत तुकाराम जोर्वेकर याने घरामध्ये हिस्सा,शेती अवजारे अशा कोणत्याच वस्तू दिल्या नाहीत.तसेच ज्ञानदेव जोर्वेकर यांना व त्यांच्या मुलाला वर्षभरापूर्वी शेतात शिवीगाळ करत मारहाण केली होती.त्यामुळे ज्ञानदेव यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.