Maharashtra247

हार्मोनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक वनमहोत्सव साजरा

 

अहमदनगर(६ जुलै):-हार्मनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वनमहोत्सव साजरा करण्यात आला.या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण आणि त्याबद्दल जनजागृती करणे हा होता.शाळेच्या भिंतीलगत आणि आजूबाजूच्या परिसरात दैनंदिन जास्त पाण्याची गरज नसलेली लवकर वाढणारी पंधरा झाडे लावण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,श्री.अशोक बेरड सर (प्राचार्य,हार्मनी इंटरनॅशनल स्कूल) यांनी पर्यावरणाचे रक्षण कसे करावे हया विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वनमहोत्सवा निमित्त इयत्ता ७ वीच्या मुलींनी एक समूह गीत सादर केले,ज्याचे सर्वांनी कौतुक केले. इयत्ता 8 वीच्या मुलांनी मूक अभिनय सादर केला,ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाची जाणीव झाली. कार्यक्रमाचे आयोजक श्री.संदेश विलास खरात (शिक्षक,हार्मनी इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.शाळेच्या मॅनेजमेंटने सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.व या वन महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

You cannot copy content of this page