Maharashtra247

गंगा सागर पश्चिम बंगाल येथे राष्ट्रीय गणेश पूजा संपन्न;अहमदनगर येथील सहजयोग्यांची कोलकत्ता गंगा सागर येथील गणेश पूजेस उपस्थिती 

 

नगर प्रतिनिधी:-प.बंगाल येथील गंगा सागर या तीर्थ स्थळी प.पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग नॅशनल ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय गणेश पूजा संपन्न झाली या पूजेस संपूर्ण भारतातून सहजयोगी उपस्थित होते.

गंगासागर येथे दिनांक 6,7 व 8 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय श्री गणेश पूजेस भारतातील सर्व राज्यातून सहजयोगी मोठया प्रमाणात उपस्थित होते.या तीन दिवसात श्री गणेश पूजा,हवन, संस्कृतीक कार्यक्रम व सेमिनार चर्चा सत्र पार पडले.यामध्ये अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने भजने सादर करण्यात आली.

या सेमिनार ला अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरासह संगमनेर, कोपरगाव मधील सहजयोगी उपस्थित होते.

या सेमिनार साठी अहमदनगर जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा, अंबादास येन्नम,संगमनेर येथील भाऊसाहेब घुले,सुभाष वाकचौरे कोपरगाव येथून उल्हास गवारे, कुंडलिक ढाकणे,मनोज वाकचौरे, चंद्रकांत रोहकले,दिलीप कार्ले,डिके साहेब व इतर सहजयोगी उपस्थित होते.

You cannot copy content of this page