Maharashtra247

शहर वकील संघटनेच्या अध्यक्षपदी राजू कातोरे,उपाध्यपदी वैभव आघाव तर सचिवपदी संदीप बुरके विजयी

 

अहिल्यानगर (दि.२१ प्रतिनिधी):-अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर कार्यकारी मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत अध्यक्षपदी राजू कातोरे हे विजयी झाले आहेत.तर उपाध्यक्षपदी वैभव आघाव व सचिवपदी संदीप बुरके हे निवडून आले आहेत.

शुक्रवार दि.२० रोजी सकाळी झालेल्या मतदानाची सायंकाळी उशीराने मतमोजणी संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. अरुण भालसिंग यांनी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर केला.या निवडणुकीत १ हजार ६९४ पैकी १ हजार १४७ मतदान झाले.

You cannot copy content of this page