कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील अट्टल सराईत गुन्हेगार तडीपार
अहमदनगर (दि.५ ऑक्टो):-कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील जुना बाजार,बॉम्बे बेकरी परिसरात राहणारा अट्टल गुन्हेगार शहरात लोकांना मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन दहशत निर्माण करणारा इरफान इस्माईल बेग (वय ४१ वर्षे रा.जुना बाजार, बॉम्बे बेकरी जवळ) याचा हद्दपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलीस स्टेशन कडुन या पुर्वी श्री.सुधीर पाटील उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग, यांना सादर करुन त्याचा पाठपुरावा करुन उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग यांचे आदेशान्वये हद्दपार प्रस्ताव मंजुरी आदेश क्रं १)४२/२०२३ दि. २०/०८/२०२४ अन्वये वरिल गुन्हेगारास अहमदनगर जिल्ह्यातुन ६ महिण्याकरीता हद्दपारीचा आदेश मंजुर करुन घेवुन कोतवाली पोलीस स्टेशनचे पोनि. श्री.प्रताप दराडे यांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तात्काळ सदर आरोपीत यास ताब्यात घेवुन त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे.
सदर हद्दपार इसमावर या पुर्वी गंभीर स्वरूपाचे प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री.प्रताप दराडे,मसपोनि/योगिता कोकाटेमपोहेको/ कांबळे,पोकों/दिपक रोहकले,पोकॉ/तानाजी पवार,पोकॉ/सुजय हिवाळे,पोकों/सत्यम शिंदे,पोकॉ/सुरज कदम पोकों/लोळगे,पोकों/ अनुप झाडबुके,पोकों/ राहुल मासाळकर यांच्या पथकाने केली आहे.