Maharashtra247

फोटोथेरेपी केंद्रामुळे मिळणार कोडग्रस्तांना नवजीवन डॉ.माया तुळपुळे

 

अहमदनगर (दि.४ ऑक्टो):-श्वेतकुष्ठ,कोड किंवा त्वचेवरील पांढरे डाग आलेल्या व्यक्तींना समाजात अवहेलना,उपेक्षा आणि भेदभाव यांचा सामना करावा लागतो.या त्वचारोगावरील उपचार अहमदनगर मध्ये नाममात्र शुल्कात उपलब्ध झाल्याने परिसरातील शेकडो रुग्णांना नवजीवन मिळेल असे प्रतिपादन पुणे येथील श्वेता असोसिएशन या संस्थेच्या संस्थापिका डॉ.माय तुळपुळे यांनी आज केले.

गरीब आणि गरजू रुग्णांना फोटोथेरपी उपचार अत्यल्प परवडणाऱ्या शुल्कात मिळावेत, यासाठी पुणे येथील श्वेता असोसिएशन,स्नेहालय आणि येथील सर्व त्वचारोग तज्ञ एकत्र आले.त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज अद्ययावत फोटोथेरपी केंद्र नगरमध्ये सुरू झाले.यावेळी डॉ.तुळपुळे, नगर मधील त्वचारोग तज्ञ डॉ.कैलास खडामकर,डॉ.अरुण वैद्य,डॉ.राजीव सूर्यवंशी,डॉ.अमित शिंदे,डॉ.मिथिला गाडेकर,डॉ.पुनम विधाते,डॉ.इंदुरकर,डॉ.अतुल नरसाळे,डॉ.वेदांत लढ्ढा,डॉ.शेख आदी उपस्थित होते.

त्वचा रोगतज्ञांचा सहयोग

अहमदनगर शहरातील सर्व त्वचारोगतज्ञ गरीब आणि गरजू रुग्णांना या केंद्राचा लाभ देण्यासाठी सामाजिक जाणिवेतून प्रयत्न करतील असे डॉ.खडमकर यांनी सर्वांतर्फे यावेळी सांगितले.डॉ.शंकर केशव आडकर संकुल,लेंडकर मळा, बालिकाश्रम रस्ता, अहमदनगर,येथे हे केन्द्र आजपासून कार्यरत झाले.महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने डॉ.तुळपुळे यांचे श्वेता असोसिएशन फोटोथेरपी सेंटर, व्हीटीलॅगो (कोडबाधितांचे) सपोर्ट ग्रुप,विवाह जुळणी , रोजगार केंद्र इत्यादी उपक्रम गेली 25 वर्ष राबवित आहेत.अहमदनगर मध्ये असे केंद्र सुरू व्हावे म्हणून मागील 4 वर्षांपासून प्रयत्न जारी होते. यासाठी लागणारी 15 लाख रुपयांची यंत्रसामुग्री श्वेता असोसिएशनने सहयोग म्हणून दिली.स्नेहालयच्या कु.सीमा जुनी,कु.सीमा गंगावणे,श्रीमती.संगीता बोतरे आणि सौ.पूनम भूपेंद्र रासने यांना श्वेता असोसिएशन ने फोटोथेरेपीचे प्रशिक्षण सौ.रासने या केंद्राच्या समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.या केंद्रासाठी जागा निवडताना नगर लगतच्या तालुक्यातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या अडचणींचा आणि खर्चाचा साकल्याने विचार करण्यात आला.तारकपूर आणि माळीवाडा बस स्थानकाला मध्यवर्ती जवळ असणाऱ्या बालिकाश्रम रस्त्यावरील डॉ.आडकर संकुलात हे केन्द्र निर्माण करण्यात आले.

या केंद्रास केअरिंग फ्रेंड्स हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर संचलित श्वेता फोटोथेरपी केंद्र असे नाव देण्यात आले आहे.स्नेहालयच्या विश्वस्त डॉ.अंशू मुळे,डॉ.शेहनाज आयुब,डॉ. स्वाती घुले,राजीव गुजर,अध्यक्ष जया जोगदंड,सचिव डॉ.प्रिती भोम्बे,खजिनदार गीता कौर आदींनी उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते.शनिवार वगळता अन्य दिवशी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत हे केंद्र रुग्ण ऊपचारासाठी उपलब्ध आहे. 

अधिक माहितीसाठी 7020945014 आणि 9588620036 येथे संपर्काचे आवाहन संस्थेने केले आहे.

You cannot copy content of this page