महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरीस प्रभाग क्रमांक १० मध्ये नागरिकांचा प्रतिसाद
अहिल्यानगर प्रतिनिधी:-महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना प्रभाग क्रमांक १० मध्ये प्रचार फेरीस नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
नगर शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून केलेली विकास कामे समोर ठेवून नगरकरांच्या समोर जात आहे. येणाऱ्या काळात यापेक्षाही भरून निधी आणून नगर शहर हे एक मॉडेल शहर म्हणून बनविणार असल्याचे असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १० मधील मंगलगेट,रामवाडी कोठला परिसर,येथील नागरिकांशी जगताप यांनी संवाद साधला.यावेळी उमेदवार आमदार जगताप यांचे ठिकठिकाणी स्वागत करून महिलांनी औक्षण केले व विजयासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी नगरसेवक सचिन जाधव,वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सागर मुर्तडकर,सुनील क्षेत्रे,रोहित मिश्रा, आकाश मनोचा,यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.