बसपा उमेदवार कु.मेघा तायडे यांच्या प्रचारार्थ शहरात भव्य प्रचार फेरी संपन्न;शहरातील तरुण व तरुणींना बेरोजगारी पासून मुक्त करणार बसपा उमेदवार कु.मेधा तायडे यांचे प्रतिपादन
अमरावती प्रतिनिधी:-अमरावती ३८ शहर विधानसभा मतदारसंघाच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार कु.मेघा तायडे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली आहे.
उमेदवार कु.मेघा तायडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ बसपा जिल्हा प्रभारी दिपक पाटील,रामभाऊ पाटील जिल्हा प्रभारी,चंद्रमणी डोंगरे,विधानसभा इंचार्ज अमरदिप सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनंजय गुल्हाणे,रविराज रामटेके,निलेश राजुरकर,कैलाश जंगम, रिना नितनवरे,बोरकर ताई,पाटील मॅडम व सर्व सहकारी महिला,राष्ट्रपाल दंदे,नाजुकराव सदांशिव,निशांत जवंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हि पदयात्रा सांयकाळी ५ ते सांयकाळी ९ वाजेपर्यंत तक्षशिला महाविद्यालय, परिगणीत कॉलनी आदर्श नेहरु नगर येथून सुरुवात झाली.
आशियाना क्लब, राहुलनगर,चपराशीपुरा येथे या यात्रेचा समारोप झाला.या पदयात्रे मध्ये निष्ठावान कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी कु.मेघा तायडे म्हणाल्या की या मतदारसंघात तरुणांना रोजगार उपलब्ध नाही यामुळे तरुण खूप व्यसनाधीन झालेले आहे.व मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवत आहेत.तसे पाहिले तर मोठमोठ्या कंपन्या किंवा आयटी पार्क असे रोजंदारी मिळेल असे उद्योग आणायचे काम स्थानिक लोकप्रतिनिधीचे असतात परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त निवडणुका जवळ आल्या की तरुणांना जवळ करून त्यांचा फायदा घेत त्यांना व्यसनाधीन बनवतात.यामुळे तरुणांचे फार मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे यांना शहरातून नव्हे तर जिल्ह्यातून हद्दपार करा व मी निवडून आल्यानंतर तरुण व तरुणींसाठी शहरामध्ये जे मोठे उद्योग आणणार आहे त्याने यांना फायदाच होणार आहे तसेच उद्योगामुळे तरुण व तरुणींना शहराच्या बाहेर जाऊन रोजगार न मिळवता इथेच रोजगार प्राप्त होणार आहे अशी संकल्पना यावेळी कु.तायडे यांनी मांडली.तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा गव्हर्नमेंटने कमी केल्याने खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आणि खाजगी शाळेमध्ये मुलांची फी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही या गोष्टीना आळा बसला पाहिजे.तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला हमीभाव ही भेटला पाहिजे या सर्व मागण्या घेऊन मी निवडणुकीला सामोरे जात आहे.आणि हे प्रश्न विधानसभेमध्ये सातत्याने मांडून शेतकऱ्यांना व पालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार असल्याचे मेधा तायडे यांनी सांगितले.