अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या नराधमाच्या कोल्हापूर येथून पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.बातमीची हकीकत अशी की,साकत खुर्द ता.जि.अहिल्यानगर येथील एका अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात आरोपीताने दि.29 मे 2025 रोजी रात्रीचे सुमारास पळून नेले होते.याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध बी एन एस कलम 137 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तरी घटनेतील पिडीत मुलगी हि आरोपी नामे कल्याण रामकिसन वाघमोडे (वय 21 वर्षे रा. भातकुडगाव ता.शेवगाव जिल्हा अहिल्यानगर) याने पळवून नेल्याचे पोलिसांना तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून दि.09 जून 2025 रोजी कसबा सांगवी (ता.कागल जि.कोल्हापुर) येथून मुलीस व वरील आरोपी यास ताब्यात घेतले.

सदर पीडित अल्पवयीन मुलगी आरोपीता सोबत असताना आरोपीने तिच्यावर बळबजरीने शारीरीक सबंध केले असे सांगितल्याने सदर गुन्ह्यात भा.न्या.संहीता कलम 64 (2) (फ), 351(2)(3) पोक्सो कलम 4,5(L),8.12, प्रमाणे हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी नामे कल्याण रामकिसन वाघमोडे वय 21 वर्षे रा. भातकुडगाव ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा पिडीत मुली सोबत मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोस्टेस आणुन त्यांचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुशंगाने सखोल चौकशी केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली देवुन त्यांचा नमुद गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते,पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे, पोलीस हवालदार आबासाहेब झावरे,पोलीस हवालदार शरद वांढेकर यांनी केली असून पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक धुमाळ हे करीत आहे.
