नवी मुंबईचे कर्तव्यदक्ष माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचा नागरी सत्कार संपन्न..हिवरगाव पावसा ते देवगड लेझीम नृत्य आणि संवाद्य मिरवणूक
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक मध्ये सहाव्यांदा नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल कुरण गावचे सुपुत्र माजी महापौर सुधाकर सोनवणे आणि नगरसेविका रंजना सोनवणे यांचा हिवरगाव पावसा येथे भव्य नागरी सत्कार संपन्न झाला.श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.कॅनरा बँक चौक हिवरगाव पावसा गावामध्ये सुधाकरजी सोनवणे आणि नगरसेविका रंजना सोनवणे यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.देवगड विद्यालयातील लेझीम पथकाने लेझीम नृत्य सादर करत स्वागत केले. हिवरगाव पावसा ते देवगड अशी संवाद्य भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी देवगड देवस्थान येथे माजी महापौर सुधाकर सोनवणे व नगरसेविका रंजना सोनवणे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख व शरयू देशमुख यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
सत्काराला उत्तर देताना नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे म्हणाले की होय हे शक्य आहे पैशाने संपन्नता येते मात्र ज्ञानाने समृद्धी मिळते.शिक्षणामुळे समृद्धी येते. चांगले शिक्षण घेतले पाहिजे.निवडणुकीला फारसे महत्व देत नाही,कामाला महत्व दिले.सन २००० ते २००५ दरम्यान तीन वर्षे आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाले.जात, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन मानवतेसाठी काम करतो.शैक्षणिक क्षेत्रात काम करतो.आमच्या अपंग विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. संपूर्ण शाळा डिजिटल केलेली आहे.आम्ही प्रभागात मंदिर बांधतो आणि त्यात प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दिन साजरा करतो.बंधू भाव शिकवतो एकत्र यावे.शाळा एक मंदिर आहे त्यातून आज्ञानी,अडाणी,निरक्षर समाजाचा विकास होणार आहे.
शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन मुलगा आणि मुलगी भेद न करता आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावे.असे आवाहन हिवारगाव पावसा ग्रामस्थांना केले. यावेळी कला सम्राज्ञी पवळा कला मंच व देवगड माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने सुधाकर सोनवणे आणि रंजना सोनवणे यांच्या नगरसेवक पदी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.या प्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,माजी मुख्याध्यापक दशरथ भालेराव, राजहंस संघाचे संचालक माणिक यादव,देवगड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाबासाहेब पावसे,सचिव अनिल गडाख,उपाध्यक्ष संतोष पावसे,खजिनदार अण्णासाहेब शिंदे,विश्वस्त सोमनाथ पावसे,गणेश गडाख,मधुकर शिंदे,विकास पावसे,अमिरत येरमल,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले,वृक्षमित्र गणपत पावसे,संपादक यादवराव पावसे,गायक हरिचंद्र भालेराव,डॉ.संदीप पावसे,कॉन्ट्रॅक्टर शेखर साबळे,डॉ. विजय पावसे,मच्छिंद्र गडाख,विशाल भालेराव,नितीनचंद्र भालेराव,सोमनाथ भालेराव,बाळासाहेब भालेराव,सोमनाथ दवंगे,सचिन सस्कर,सगन भालेराव,सुयोग भालेराव यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
