गुरुद्वारा गोविंदपुरा येथे ‘हिंद दी चादर’ महाआरोग्य शिबिराचा जनसागर..११०३ रुग्णांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आरोग्यसेवेचा नवा आदर्श..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गुरुद्वारा गोविंदपुरा येथे आयोजित करण्यात आलेले “हिंद दी चादर महाआरोग्य शिबीर” उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. समाजातील सर्व घटकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या आरोग्य शिबिराचे मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी केले.त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिबिराचे नियोजन,व्यवस्थापन आणि अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे पार पडली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.डावरे (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक),डॉ.वलांडे (RMO) व डॉ.गणेश सोळुंके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच नोडल ऑफिसर म्हणून डॉ.घोलप यांनी उत्कृष्ट समन्वय साधत संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या महाआरोग्य शिबिरात एकूण ११०३ रुग्णांची तपासणी व निदान करण्यात आले. विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच आवश्यक उपचारांचा सल्लाही देण्यात आला. शिबिरामुळे अनेक नागरिकांना वेळेत तपासणी व सल्ला मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.एकूणच, आरोग्य जागरूकता आणि सेवा यांचा संगम घडवून आणणारे हे महाआरोग्य शिबिर अत्यंत यशस्वी ठरले असून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
