आमदार महेश लांडगे यांच्या वक्तव्याने वादाचा भडका! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची थेट मागणी गुन्हा दाखल करा व तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – अहिल्यानगर येथील मढी येथे झालेल्या कार्यक्रमात मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधान केल्याचा आरोप करत पिंपरी-भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
‘हेट स्पीच’चा आरोप
दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथील मढी येथे ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने आयोजित मोर्चात आमदार महेश लांडगे यांनी भाषण केले होते. या भाषणादरम्यान मुस्लिम समाजाबाबत जाणीवपूर्वक आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधान केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने केला आहे. हे विधान समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करणारे असून ते ‘हेट स्पीच’च्या श्रेणीत येते, असे पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्वतःहून (सुओ मोटो) फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
“आमदार लांडगे यांचे विधान दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. प्रशासनाने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शिष्टमंडळाची उपस्थिती
प्रशासनाला निवेदन देताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनिल खरात, जिल्हा उपाध्यक्ष अर्शद लखपती, तसेच अनिस गंगापुरकर, हन्नु नाना, शाहिद लखपती, जाकीर जे. के., आसिफ चाऊस, शहजाद भाई, इमरान भाई, आसिफ शेठ, अलीम मामू, निसार भाई, महेश निकम, कलीम पटेल, बिलाल नवाब, एकबाल खान, ममशाद लखपती, सोफियान भाई, रेहान भाई, राज भाईजी, बादशाह लखपती, गणेश गौरय, अमजद खान, नौशाद लखपती, बाबर खान आदी उपस्थित होते.
